Belagavi

बेळगावात भाजप-जेडीएस नेत्यांची समन्वय बैठक

Share

देशाच्या सुरक्षेसाठी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची गरज असल्याचे मत माजी मुख्यमंत्री व बेळगाव भाजपचे लोकसभा उमेदवार जगदीश शेट्टर यांनी व्यक्त केले.

बेळगावातील एका खासगी हॉटेलमध्ये झालेल्या भाजप-जेडीएस समन्वय बैठकीत दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी लोकसभा निवडणुकीसाठी चर्चा करू भाजप-जेडीएस युतीचे उमेदवार जगदीश शेट्टर यांना विजयी करण्याचा निर्धार केला. काँग्रेसचा पराभव करणे हेच आमचे ध्येय असल्याचे सांगत लोकसभा निवडणूक एकत्रितपणे लढविण्याचे दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी मान्य केले. त्यानंतर संयुक्त पत्रकार परिषद घेऊन दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी आपल्या भूमिका मांडल्या.

राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी म्हणाले की, राष्ट्रीय स्तरावर जेडीएस-भाजपचे नेते एकत्र आल्यानंतर जिल्ह्यातील सर्व नेते एकत्र आले आहेत. आधी भाजप-जेडीएसने राज्यात सरकार स्थापन केले तर दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते दुधात साखरेप्रमाणे एकत्र काम करतील.

राज्यातील 28 पैकी 28 जागा जिंकण्याचे आमचे ध्येय असल्याचे जेडीएस जिल्हाध्यक्ष शंकर माडलगी यांनी सांगितले. देवेगौडा यांनी सांगितल्याप्रमाणे जगदीश शेट्टर यांना बहुमताने निवडून आणण्यासाठी आम्ही काम करू, एकमेकांचे कार्यकर्ते न सोडता एकत्र निवडणुकीला सामोरे जाऊ आणि उद्दिष्टे राज्यातील जनतेला चांगला संदेश देण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे ते म्हणाले.

भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर म्हणाले की, देवेगौडा, कुमारस्वामी यांनी पंतप्रधान मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्याचा निर्णय घेऊन एनडीए युतीमध्ये सामील झाल्यापासून राज्यात खूप बदल झाला आहे. भाजपला 25 जागा तर जेडीएसला 3 जागा सोडल्या आहेत. जेंव्हा मी पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आलो तेंव्हा देवेगौडा यांचे मला खूप मार्गदर्शन मिळाले असे सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत हा जगातील पाचव्या क्रमांकाचा आर्थिक विकास करणारा देश बनला आहे. त्याला तिसऱ्या क्रमांकावर नेण्याचा मोदींचा निर्धार आहे. त्यामुळे अनेक पक्षांना एनडीएसोबत युती हवी होती आणि जेडीएस त्यापैकी एक होता. भाजप आणि जेडीएसचे उद्दिष्ट काँग्रेसचे कुशासन संपवणे हे आहे, असे ते म्हणाले.

काँग्रेस पक्षाला नेता नाही, 100 सिद्धरामय्या डीकेशी, खर्गे आणि राहुल गांधी आले तरी त्यांची मोदींशी तुलना होऊ शकत नाही. मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. जगदीश शेट्टर यांना मोठ्या फरकाने विजयी करून मोदींचे हात बळकट करण्यासाठी भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले. राहुल गांधी असो वा ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस आणि विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीत पंतप्रधान मोदींना पर्यायी नेता नाही, अशी टीका त्यांनी केली.

पत्रकार परिषदेला राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी, जगदीश शेट्टर, जेडीएसचे जिल्हाध्यक्ष शंकर माडलगी, एमएलसी हनुमंत निरानी, ​​भाजप प्रवक्ता एम. बी. जिरली, भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, माजी एमएलसी महांतेश कवटगीमठ, भाजप राज्य उपाध्यक्ष अनिल बेनके आदी उपस्थित होते.

Tags: