कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा राज्यांमध्ये एकूण 211 शाखा असलेल्या एकसंबा येथील श्री बिरेश्वर को-ऑप क्रेडिट सोसायटी (मल्टिस्टेट)ला आर्थिक वर्षाच्या मार्च अखेरीस 40.55 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाल्याचे श्री बिरेश्वर सहकारी संस्थेचे अध्यक्ष जयनंद यांनी सांगितले.

चिक्कोडी तालुक्यातील एकसंबा शहरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, संस्थापक अण्णासाहेब जोल्ले व सहसंस्थापक शशिकला जोल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारी संस्थेने कर्नाटकातील १६६, शाखांसह महाराष्ट्रात ४३ आणि गोव्यात 2 अशा एकूण २११ शाखांद्वारे सेवा सुरू केली आहे.


आगामी काळात राज्यात आणि शेजारील राज्यात एकूण 45 नवीन शाखा सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मार्चअखेर संस्थेचे 3,78,504 सभासद होते ज्याची उलाढाल 33.01 कोटी रुपये होती. 167.59 कोटी भाग भांडवल आणि राखीव निधी आहे चालू आर्थिक वर्षात 3,820 कोटी रु. ठेव जमा आहे. संस्थेकडून आतापर्यंत 2,887 कोटी रु. कर्ज वाटप केले.
यावेळी हलसिद्धनाथ साखर कारखान्याचे व्यवस्थापक आप्पासाहेब जोल्ले, सिद्राम गडदे, लक्ष्मण कबाडे, यासीन तांबोळे, जयपाल लंगोटे, लक्ष्मण हिंगलाजे, बी.एन.माळी, जिलेंद्र मुरारी, संतोष शिंदे सहकार व्यवस्थापक आर.सी.चौगला, , अधिकारी एम.के.चौगला, आर.सी. एसके माने, के.एम.हुन्नरगी, शिवू डब्बनवर
इतर उपस्थित होते.


Recent Comments