मृणाल हेब्बाळकर यांनी बेळगाव मतदारसंघातून तर प्रियांका जारकीहोळी यांनी चिक्कोडी मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवावी, असा स्थानिक नेते व कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. पण याबाबत पक्ष हायकमांडच अंतिम निर्णय घेईल, असे मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी स्पष्ट केले.
सोमवारी मालूर तालुक्यातील केजे हळ्ळी येथे आयोजित हमी योजनांच्या सर्कल स्तरीय मेळाव्यात मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी भाग घेतला. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री हेब्बाळकर म्हणाल्या की, बेळगाव आणि चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार निवडीबाबत काँग्रेस हायकमांडचा निर्णय अंतिम आहे.
मृणाल हेब्बाळकर बेळगाव मतदारसंघातून तर प्रियंका जारकीहोळी यांनी चिक्कोडी मतदारसंघातून निवडणूक लढवावी, अशी स्थानिक नेत्यांची अपेक्षा आहे. मात्र याबाबतचा अंतिम निर्णय जिल्ह्याचे नेते व ज्येष्ठ घेतील, असे मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले.


Recent Comments