विजयपूर जिल्ह्यातील सिंदगी तालुक्यातील गबसावलगी गावात रात्री उशिरा उसाच्या शेतात अचानक आग लागल्याने उसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
या आगीत तीन शेतकऱ्यांच्या उसाचे नुकसान झाले. अरलाप्पा मुल्लोल्ली, प्रभूगौडा बिरादार , शेखुगौडा बिरादार या शेतकऱ्यांचे ऊसाचे नुकसान झाले आहे. 14 एकर ऊसाचे नुकसान झाले असून सुमारे 4 लाखांचा ऊस जळून खाक झाला आहे. सिंदगी येथील अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवली. ही घटना सिंदगी पोलीस ठाण्यांतर्गत घडली.


Recent Comments