अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज मद्यप्रेमींच्या हितासाठी लोकप्रतिनिधींमध्ये रंजक चर्चा झाली.
तिरुवेकरे येथील आमदार एम. टी. कृष्णप्पा यांनी दारूच्या किमती वाढल्याचा उल्लेख करून सिद्धरामय्या यांच्या कारभारात दारू महाग झाल्याचे सांगितले. 50 रु. दर वाढवल्याने सध्याची ओटीची किंमत 220 रुपये झाली आहे, असे ते म्हणाले.
त्यामुळे तुम्हाला काही अडचण झाली का, असा सवाल काँग्रेसच्या एका आमदाराने केला.
यावेळी कृष्णप्पा यांनी आम्ही अडचणीत नाही, आम्ही स्कॉच पिणारे आहोत, पण त्या बिचाऱ्यांची परिस्थिती काय झाली आहे ते पहा अशी प्रतिक्रिया दिली.
दारू प्रेमींसह सर्वानीच आम्हाला मतदान केले आहे. त्यांचाही विचार करायला हवा. डोकी फोडून मोबदला घेणे योग्य नाही, असे सांगत त्यांनी मद्यपींच्या बाजूने बॅटिंग केली.


Recent Comments