Banglore

जेडीएसच्या आरोपांवर डी के शिवकुमार यांचे ठोस प्रत्त्युत्तर

Share

रामनगरात दंगल घडवणारे जेडीएस आणि त्यांचे नेते एच. डी. कुमारस्वामी हे आहेत असा पलटवार उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी केला आहे.

कनकपुरमध्ये पत्रकारांशी बोलताना शिवकुमार यांनी, रामनगरात सुरू असलेल्या सर्व दंगलींसाठी थेट कारण असल्याचे कुमारस्वामीच आहेत असे सांगत, रामनगरात डीके बंधूंकडून अशांतता निर्माण केल्याच्या जेडीएस नेत्यांच्या आरोपांवर पलटवार केला.  तसेच भाजपमध्ये अशांतता निर्माण करणे सर्रास आहे. ते जातीय मुद्दे घेऊन राजकारण करतात. भाजपला अल्पसंख्यांकाला बघवत नाही. स्थानिक आमदार आणि अधिकारी अल्पसंख्याक समाजातील असल्याने भाजप राजकारण करत आहे. अल्पसंख्याक अधिकारी नसावेत, असे त्यांनी विधानसभेतच म्हटले नाही का, असे सांगत त्यांनी भाजप आणि जेडीएसविरोधात संताप व्यक्त केला.

लोकसभा निवडणुकीच्या तयारीबाबत आम्ही गेल्या निवडणुकीच्या दुसऱ्या दिवसापासून कामाला सुरुवात केली होती. त्यांनी आम्हाला बांधून ठेवू म्हटले आहे, बघू, जमत असेल तर आम्हाला बांधून ठेवा, असे आव्हान दिले आहे.

Tags: