चांगला पाऊस पडावा आणि चांगले भरभरून पीक यावे यासाठी धारवाड तालुक्यातील हेब्बळ्ळी गावातील एक तरुण इरण्णा करीकट्टी याने नांगर आणि छकडी गाडी ओढत उळवी तीर्थक्षेत्राला पदयात्रा सुरु केली आहे.
राज्यातील भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर, धारवाड तालुक्यातील हेब्बळ्ळी गावातील इरण्णा करीकट्टी या तरुणाने खांद्यावर नांगर घेऊन छकडी गाडी ओढत जोयडा तालुक्यातील श्री क्षेत्र उळवी येथे पायी यात्रा करत निघाला आहे. 24 फेब्रुवारी रोजी श्री क्षेत्र उळवी होणाऱ्या श्री चन्नबसवेश्वर जत्रेसाठी त्याने ही पदयात्रा सुरु केली आहे. इरण्णा हा तरुण दरवर्षी छकडी गाडी घेऊन उळवी येथे जातो. हेब्बळ्ळी गावातील इतर तरुण त्याला साथ देत आहेत.


Recent Comments