Banglore

अवैध दारूविक्रीवर विधानसभेत जोरदार चर्चा

Share

राज्यात अवैध दारूविक्रीच्या विळख्याने परिसीमा ओलांडली आहे. गृहिणी मला रात्री 12.00 वाजता फोन करतात आणि विचारतात की हे थांबवता येणार नाही का?,” अशा शब्दांत माजी गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र यांनी व्यथा मांडली.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आज विधानसभेत अवैध दारू विक्रीवर जोरदार चर्चा झाली. या चर्चेदरम्यान अरग ज्ञानेंद्र म्हणाले की, राज्यात अवैध दारू विक्रीने मर्यादा ओलांडली आहे. गृहिणी मला रात्री 12.00 वाजता कॉल करतात आणि मला विचारतात की मी हे थांबवू शकत नाही,” माजी गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र यांनी खंत व्यक्त केली.

आमदार धीरज मुनिराजू यांनी उत्पादन शुल्क मंत्र्यांना केलेल्या प्रश्नामुळे चर्चेला उधाण आले. धीरज मुनिराजू यांनी अवैध दारू विक्रीचे किती गुन्हे दाखल केले आहेत, या प्रश्नाला उत्तर देताना उत्पादन शुल्क मंत्री आर. बी. तिम्मापुर म्हणाले की, गेल्या वर्षभरात 138 गुन्हे दाखल झाले असून 152 जणांना अटक करण्यात आली आहे.

तेव्हा धीरज मुनिराजू म्हणाले की, दोड्डबळ्ळापूरमध्ये प्रत्येक गावात अवैध दारू विक्री होत आहे. याशिवाय काहीजण आंध्रच्या सीमावर्ती जिल्ह्यांतून शिंदी आणून विकत आहेत. याप्रकरणी अद्याप कोणतीही कठोर कारवाई झालेली नाही, असे ते म्हणाले. अरग ज्ञानेंद्र यांनीही कारवाईची मागणी करत केवळ अवैध दारू विक्री करणाऱ्यांवरच नव्हे तर मोठ्या प्रमाणात दारू पुरवठा करणाऱ्यांवरही कारवाई करावी, अशी मागणी केली.

Tags: