Banglore

बेंगळुरच्या फ्रीडम पार्कमध्ये भाजपची गुरे घेऊन निदर्शने

Share

काँग्रेस सरकारने दूध उत्पादकांना सवलतीचा दर देण्याची घोषणा केली होती, ती आजतागायत दिली नाही. यातून शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा आरोप करत भाजपने राज्य सरकारच्या विरोधात बेंगळूरच्या फ्रीडम पार्कमध्ये जोरदार आंदोलन केले.

बेंगळुर येथील फ्रीडम पार्कमध्ये गायींना आंदोलनासाठी आणत भाजप नेत्यांनी जोरदार निदर्शने करून राज्य सरकारवर जोरदार टीका केली. राज्य सरकारकडून शेतकऱ्यांवर अन्याय केला जात असल्याचे भाजप नेत्यांनी सांगितले.

राज्यातील काँग्रेस सरकार जनतेलाच नव्हे तर गुरांवरही अन्याय करत आहे. दूध उत्पादकांना अनुदानात वाढ, गायी-म्हशी खरेदीसाठी कमी व्याजदरात कर्ज देण्याचे आश्वासन देऊन आता कर्ज देत नाही आणि अनुदान वाढवत नाही, असा टोला भाजप नेत्यांनी लगावला. आता शेतकऱ्यांना द्यायचे ७१६ कोटी रुपये दूध अनुदान न देता वंचित ठेवल्याचा आरोप त्यांनी केला. .

त्यामुळे राज्यातील दुधाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. लोकांसोबतच गुरांच्या शापाचा फटका मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनाही बसेल असा संताप भाजप नेत्यांनी व्यक्त केला. भाजपकडून राज्य सरकारच्या विरोधात गोरक्षण आंदोलन करण्यात आले. गायींच्या गळ्यात ‘तांदूळ देणाऱ्यांना टोपी घालणाऱ्या शेतकरी विरोधी सरकारचा अवमान’ असे फलक बांधून निदर्शने करण्यात आली.

यावेळी बोलताना कुडचीचे माजी आमदार पी. राजीव म्हणाले की, सीएम सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकार जनतेचीच नव्हे तर गुरांचीही फसवणूक करत आहे. जुलै 2023 पासून शेतकऱ्यांचे अनुदानाचे पैसे वितरित करण्यात आलेले नाहीत. आता त्याची रक्कम 716 कोटी रुपये आहे. तुम्हाला लक्झरी चार्टर फ्लाइटवर जाणे परवडते. पण, शेतकऱ्यांची देणी देण्यासाठी तुमच्याकडे पुरेसे पैसे नाहीत का? आम्ही गायी घेऊन विधानसभेला घेराव घालू, असा इशारा त्यांनी दिला.

यावेळी फ्रीडम पार्क ते विधानसौधपर्यंत गायी घेऊन आंदोलन करू पाहणाऱ्या भाजप नेत्यांसह कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवून गाई मागे टाकून ताब्यात घेतले. यावेळी फ्रीडम पार्कमध्ये काही काळ हायड्रामा झाला. भाजपचे प्रदेश सरचिटणीस नंदिश रेड्डी, पी. राजीव, रयत मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष ए. एस. पाटील- नडहळ्ळी, बंगळुरू उत्तर जिल्हाध्यक्ष एस. हरीश, बंगळुरू मध्य जिल्हाध्यक्ष सप्तगिरी गौडा, बंगळुरू दक्षिण जिल्हाध्यक्ष के.सी. राममूर्ती यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. भाजप नेते तमेश गौडा यांच्यासह महत्त्वाचे लोक उपस्थित होते.

Tags: