Banglore

मी हिंदुविरोधी नाही, मी सर्वांवर प्रेम करणारा हिंदू : सिद्धरामय्या

Share

भाजप मला हिंदूविरोधी म्हणून दाखवत आहे. पण मी हिंदूविरोधी नसून, सर्व धर्मांवर प्रेम करणारा हिंदू असल्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी ठणकावले.

बेंगळुरूमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की, केरेगोडू प्रकरणात भाजप विनाकारण वाद निर्माण करत आहे. भाजप मला हिंदूविरोधी म्हणून दाखवत आहे. मात्र मी सर्व धर्मांवर प्रेम करणारा हिंदू असून विनाकारण वाद निर्माण करणे हा भाजपचा अजेंडा आहे. त्यांनी राष्ट्रध्वज आणि कन्नड ध्वज फडकवण्याची परवानगी घेतली होती, मात्र भगवा ध्वज फडकवला असल्याचे त्यांनी सांगितले. कोणताही ध्वज उभारण्यास आमचा आक्षेप नाही. पण डीसी ऑफिसजवळ हे सर्व करणे योग्य नाही, असे सिद्धरामय्या म्हणाले.

विरोधी पक्षनेते आर. अशोक आणि जेडीएस नेते एचडी कुमारस्वामी मंड्याला भेट देऊन प्रोत्साहन देत आहेत. ते कार्यकर्त्यांना कशाला भडकावत आहेत?, भाजप निवडणूक जवळ आल्याने निषेधाचे नाटक करत आहे. हे सर्व निवडणूक प्रचाराचे तंत्र आहे आणि पंचायतीने ज्यासाठी परवानगी दिली होती तेच करायला हवे होते. अन्यथा जिल्हा प्रशासनाने हस्तक्षेप का केला असता, असा सवालही त्यांनी केला.

Tags: