Banglore

बसवण्णा कर्नाटकचे सांस्कृतिक नेते : सरकारची महत्त्वपूर्ण घोषणा

Share

कर्नाटकचे सांस्कृतिक नेते म्हणून बसवण्णा यांच्या नावाची घोषणा करून राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

गुरुवारी झालेल्या राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. विश्वगुरू बसवण्णा यांना कर्नाटकचे सांस्कृतिक नेते घोषित करण्यात आले आहे. याबाबतचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. जगात सर्वप्रथम बसवेश्वरांनीच लोकशाहीची संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे.

त्यामुळे राज्यातील आणि सर्व मठाधिपतींनी त्यांना कर्नाटकचे सांस्कृतिक नेते घोषित करण्याची मागणी केली होती. त्यावर मंत्रिमंडळात चर्चा होऊन मान्यता दिल्याचे मंत्री ईश्वर खांद्रे यांनी सांगितले. बेळगाव जिल्ह्यातील कित्तूरचे नाव बदलण्याचीही मागणी करण्यात आली होती. या पार्श्‍वभूमीवर, मंत्रिमंडळाने कित्तूरचे नाव “चेन्नम्मा कित्तूर” असे ठेवण्यास मंजुरी दिली.

12 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी या कालावधीत राज्य विधिमंडळाचे अधिवेशन होणार असून कर्नाटक राज्याचा अर्थसंकल्प 16 फेब्रुवारीला सादर होईल, असा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यपाल थावरचंद गेहलोत 12 फेब्रुवारीला विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दोन्ही सभागृहांना संबोधित करतील.

Tags: