मैत्रिणींसोबत पार्टीला जाण्यासाठी घरून निघालेल्या विद्यार्थिनीने आणि स्कूल बसच्या ड्रायव्हरने रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना चिक्कमगळूरू जिल्ह्यातील आझमपूर तालुक्यातील बंकनकट्टे येथे घडली.
स्कूल बसचा चालक संतोष आणि आठवीच्या वर्गात शिकणारी जान्हवी यांनी आत्महत्या केली. मृत जान्हवी ही आझमपूर तालुक्यातील गिरियापूर गावातील ज्ञानदीप या खासगी शाळेत शिकत होती. संतोष हा गेल्या तीन वर्षांपासून या शाळेत स्कूल बस चालक म्हणून कार्यरत होता.
संतोष आपली मुलगी जान्हवीला आपल्या प्रेमात पाडण्यासाठी त्रास देत असल्याचे पालकांनी शाळेच्या मुख्याध्यापकांच्या निदर्शनास आणून दिले होते.
मात्र, व्यवस्थापनाने संतोषवर कोणतीही कारवाई केली नाही. काल आपल्या मित्रांसोबत न्यू इयर पार्टीला जात असल्याचे सांगून घराबाहेर पडलेल्या जान्हवीला प्रत्यक्षात संतोषने आपल्या सोबत नेले होते. मात्र, त्यांनी मध्यरात्री रेल्वेखाली झोकून देऊन आत्महत्या केली. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी पाहणी करून दोघांचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी चिकमंगळूर जिल्हा रुग्णालयात पाठवून पुढील कारवाई केली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


Recent Comments