उसाने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला भरधाव वेगात आलेल्या कारने मागून धडक दिल्याने तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळी राष्ट्रीय महामार्गावर निपाणीजवळ घडली.

पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी सकाळी उसाने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला कारची धडक बसली. या घटनेत कारच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला असून कारमधील तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. कार चालक अन्वर पठाण (वय 42), गजानन कट्टी (वय 55) आणि त्यांची पत्नी सुरेखा कट्टी (वय 50) (सर्व इचलकरंजी शहरातील रहिवासी) अशी जखमींची नावे आहेत.

अपघाताची माहिती मिळताच 108 रुग्णवाहिका ईएमटी गुरुलिंगप्पा आणि पायलट मंजू यांनी पोलिसांसह रस्ता व्यवस्थापन पथकाला पाचारण करून जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. निपाणी परिमंडळाचे पोलीस निरीक्षक बी.एस. तलवार व निपाणी शहर पोलिस ठाण्याच्या उपनिरीक्षक उमादेवी यांनी घटनास्थळाची पाहणी करून तपास सुरू केला. याप्रकरणी निपाणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Recent Comments