कोविड काळात झालेल्या घोटाळ्याची आणि पीएसआय परीक्षा घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी सरकारने आयोग स्थापन केला आहे, बसनगौडा पाटील-यत्नाळ यांनी या घोटाळ्यातील भ्रष्टाचाराची कागदपत्रे या आयोगासमोर सादर करावीत अशी सूचना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केली.
कोप्पळ येथे आज प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की, बसनगौडा पाटील-यत्नाळ यांनी थेट त्यांच्या पक्षाचे तत्कालीन मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी कोविड काळात खूप भ्रष्टाचार केला, असा आरोप केला आहे. आरोप करणाऱ्यानी आयोगाला रेकॉर्ड, पुरावे देऊ द्या. आम्ही चौकशी करू, असे ते म्हणाले.
बसवराज रायरेडडी आर्थिक तज्ज्ञ आहेत. त्यामुळे त्यांची आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. येडियुरप्पा मुख्यमंत्री असताना त्यांनीही आर्थिक सल्लागार नेमले होते. तेव्हा त्यांची कोणी चौकशी का केली नाही, असा सवाल त्यांनी विरोधकांना केला.


Recent Comments