Banglore

लोकसभा उमेदवारीसंदर्भात मुख्यमंत्र्यांसह 4 जानेवारीला दिल्लीला : डीकेशी

Share

लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांच्या निवडीबाबत हायकमांडसोबत चर्चा करण्यासाठी 4 जानेवारीला मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासोबत दिल्लीला जाणार आहे, असे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी सांगितले.

बेंगळूर येथे आज प्रसारमाध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी सांगितले की, लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या निवडीबाबत हायकमांडसोबत चर्चा करणार आहोत. त्यासाठी येत्या 4 तारखेला मी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासोबत दिल्लीला जात आहे. तेथे पक्षाच्या बैठकीतही सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. आमच्या सर्व मंत्र्यांच्या कामगिरीचा अहवाल हायकमांडला देण्यात येणार आहे. त्याचा हायकमांड अभ्यास करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अल्पसंख्याक वसाहतींच्या विकासासाठी हजार कोटी अनुदान देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या घोषणेवर प्रतिक्रिया देताना डी. के. शिवकुमार म्हणाले की, रामनगरला येऊन बघा, आमच्यात आणि इतरांमध्ये फरक आहे, इतर गावात नरेगा योजना येईल, पण ग्रामीण लोकांचे जीवन बदलले पाहिजे. यावर मुख्यमंत्र्यांनी चांगला निर्णय घेतला आहे. भाजपला काय बोलायचे ते बोलू द्या, पण आम्ही आमचे काम करू असे डीके शिवकुमार म्हणाले.

Tags: