Banglore

आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्यांना विजयेंद्र यांचा इशारा

Share

मी बसनगौडा पाटील-यत्नाळ आणि इतर सर्वांना यापूर्वीही बजावले आहे असा इशारेवजा संकेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी दिला आहे. भाजपच्या प्रदेशाध्यक्षांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्यांना विजयेंद्र यांनी इशारा दिला आहे. अशा वक्तव्यांमुळे राज्यातील पक्ष आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर परिणाम होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दिल्लीत शनिवारी सकाळी पत्रकारांशी बोलताना विजयेंद्र म्हणाले की, मी प्रदेशाध्यक्ष आणि येडियुरप्पा यांचा मुलगा म्हणून मी गर्वाने बोलत नाही. हायकमांडच्या नेत्यांनी मला अधिकार दिले. माझ्यासमोर लोकसभा निवडणूक हेच लक्ष्य आहे. राज्यात कार्यकर्ते तपश्चर्या म्हणून काम करत आहेत. आपली बदनामी होईल असे काहीही करू नका, असे त्यांनी यत्नाळ आणि अन्य नेत्यांना आवर्जून सांगितले.

येडियुरप्पा यांचा मुलगा असल्याचा मला अभिमान आहे. येडियुरप्पा हे दिग्गज नेते असून त्यांनी अनेक नेते घडवले आहेत. येडियुरप्पा कोणत्या प्रकारची शक्ती आहेत हे संपूर्ण राज्याला माहीत आहे, असे सांगून ते म्हणाले, “मी कोणाच्याही विरोधात तक्रार करण्यासाठी काहीही केलेले नाही. मी सर्वांच्या प्रेमाने आणि विश्वासाने काम करेन, असे ते म्हणाले.

Tags: