कोविडच्या नव्या विषाणूच्या भीतीच्या पार्श्वभूमीवर ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या उत्सवासाठी काय खबरदारी घेतली जाऊ शकते यावर चर्चा करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांसमवेत गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी बैठक घेतली.
कोविडच्या भीतीच्या पार्श्वभूमीवर ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या उत्सवासाठी काय खबरदारी घेतली जाऊ शकते यावर चर्चा करण्यासाठी गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी बेंगळूर येथे आज वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. यावेळी महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली.
बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना गृहमंत्री जी. परमेश्वर म्हणाले, ‘ख्रिसमस आणि नववर्ष साजरे करण्यावर राज्यात कोणतेही बंधन घातले जाणार नाही, मात्र अशा प्रसंगी लोकांनी सावधगिरी बाळगली पाहिजे. सर्वांनी खबरदारी घ्यावी. गर्दीच्या ठिकाणी मास्क घालावेत, असे ते म्हणाले. आम्ही बेंगळूरच्या सर्व भागात सुरक्षा पुरवू. नवीन वर्षाच्या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बेंगळूर शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांवर पोलिस बंदोबस्त पुरवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.


Recent Comments