कोरोनाच्या नव्या स्ट्रेनच्या पार्श्वभूमीवर ख्रिसमस, वैकुंठ एकादशी किंवा न्यू इयर सेलिब्रेशनवर कोणतेही बंधन घातले जाणार नाही, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी स्पष्ट केले आहे.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी कोविड संसर्गाच्या वाढीबाबत तांत्रिक सल्लागार समितीची आज महत्वाची बैठक विधानसौधमध्ये घेतली. या बैठकीला उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री दिनेश गुंडूराव, गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर, वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. शरणप्रकाश पाटील यांची उपस्थिती होती.
तांत्रिक सल्लागार समितीच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी माहिती दिली की, कोविड विषाणूच्या उप-प्रजातींबद्दल कोणतीही भीती बाळगू नये, परंतु जनतेने सतर्क राहावे, कोविडबद्दल काळजी करण्याची गरज नाही, फक्त काळजी घ्यावी. गर्दीत काम करणाऱ्यांनी अनिवार्यपणे मास्क घालावे. सर्व रुग्णालयात आवश्यक ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर आणि औषधे असतील, याची खात्री आम्ही केली आहे, असे त्यांनी सांगितले.


Recent Comments