Banglore

सिद्धरामय्या यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट

Share

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन नैसर्गिक आपत्तीबाबत तातडीने उच्चस्तरीय बैठक घेऊन राज्याला दुष्काळ भरपाई निधी देण्यासाठी पावले उचलण्याची विनंती केली.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज संसदेत अमित शहा यांची भेट घेतली आणि राज्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत माहिती दिली. राज्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून 236 तालुक्यांपैकी 223 तालुके दुष्काळग्रस्त आहेत. सुमारे 48.19 लाख हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी विशेषत: मोठ्या संख्येने अल्प व अत्यल्प भू-धारक शेतकरी प्रचंड अडचणीत आहेत.

राज्य सरकारने एनडीआरएफ मार्गदर्शक तत्त्वांनुसार दुष्काळ निवारणासाठी पहिला प्रस्ताव सादर करून तीन महिने उलटले आहेत. त्यामुळे तातडीने उच्चस्तरीय समितीची बैठक घेऊन 18,177.44 कोटी रुपये निधी दुष्काळ निवारणासाठी देण्याची विनंती सिद्दरामय्यांनी अमित शहा यांना केली.
यावेळी कर्नाटकचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Tags: