बेनामी पैसा कमावणे हे चुकीचेच आहे, तशांना शिक्षा झालीच पाहिजे. मात्र सध्या काँग्रेस नेत्यांना लक्ष्य करत आयटी छापे टाकण्यात येत असल्याचा आरोप मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केला.
बेंगळूरमध्ये आज, रविवारी विधानसौध येथे माजी मुख्यमंत्री दिवंगत एस. निजलिंगप्पा यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यावर प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला. झारखंडमधील काँग्रेस खासदाराच्या घरी आयटी छाप्याच्या माध्यमातून पैसा सापडला असून, अल्पसंख्याकांसाठी आर्थिक सुविधा नसलेल्या काँग्रेस नेत्यांच्या घरात प्रचंड पैसा मिळत असल्याच्या भाजप प्रदेशाध्यक्ष विजयेंद्र यांच्या वक्तव्यावर सिद्दरामय्यांनी प्रतिक्रिया दिली. बेनामी पैसा मिळवणे हे कायदेशीरदृष्ट्या चुकीचेच आहे. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे.
मात्र काँग्रेस पक्षालाच लक्ष्य करून आयटी छापे टाकले जात आहेत. भाजपचे नेते वा कार्यकर्त्यांवर आयटी छापे पडत नाहीत. भाजप नेत्यांच्या घरांवर आयटी छापे पडले तर करोडोनी बेनामी पैशांचे मोठे घबाड मिळू शकते, असे ते म्हणाले.


Recent Comments