Banglore

निवडणूक आयोगाच्या नोटीसला उत्तर देऊ : डीकेशि

Share

तेलंगणात आम्ही आमच्या सरकारच्या जाहिरातींमध्ये आमच्या यशाचा दावा केला आहे आणि मतांसाठी प्रचार केला नाही. त्यामुळे हा आचारसंहितेचा भंग होत नाही, असा दावा उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी केला.

शिवकुमार यांनी मंगळवारी त्यांच्या सदाशिवनगर येथील निवासस्थानी माध्यमांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. तेलंगणाच्या वर्तमानपत्रात कर्नाटक सरकारच्या हमी योजनांच्या जाहिरातींबाबत निवडणूक आयोगाने नोटीस जारी केल्याबद्दलच्या प्रश्नाला शिवकुमार यांनी उत्तर दिले.

“जाहिरातीत सरकारच्या कामाची माहिती आहे. काँग्रेस पक्षाला किंवा अमूक उमेदवारांना मतदान करा असे सांगत नाही. हे उल्लंघन कसे होऊ शकते? आमच्या सरकारने हमी योजना राबवल्या नाहीत, असा प्रचार विरोधक करत आहेत. मासिके आणि वर्तमानपत्रात आमच्या जाहिराती काहीवेळा तेलंगणा, तामिळनाडूसह इतर राज्यांमध्ये असतात. जर आम्ही मते मागितली असती, तर ते नियमांचे उल्लंघन झाले असते. आम्ही निवडणूक आयोगाच्या नोटीशीला उत्तर देऊ,” असे ते म्हणाले.

महामंडळांच्या अध्यक्ष नियुक्तीच्या बैठकीबाबत त्यांना विचारले असता शिवकुमार म्हणाले की, “या विषयावर बैठकीच्या दोन-तीन फेऱ्या झाल्या आहेत. आज बैठक घेऊन यादी दिल्लीला पाठवू

Tags: