Banglore

राष्ट्रपिता महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरूंचे स्वप्न साकार करा : मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर

Share

राष्ट्रपिता महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू मुलांसाठी नेहमी आदर्श आहेत. आजच्या पिढीतील मुलांनी त्यांचे स्वप्न साकार केले पाहिजे असे आवाहन मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केले.

बेंगळूर येथील कब्बन पार्कमधील बाल भवन येथे गुरुवारी आयोजित ‘बाल दिन’ कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना मंत्री हेब्बाळकर म्हणाल्या की, भारत जगात समृद्ध होत आहे. संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे लागले आहे. याला आजची तरुणाई कारणीभूत आहे.

पालकांनीही मुलांना चांगले शिक्षण देऊन नेहरू, गांधीजींसारख्या महान व्यक्तींबद्दल सांगितले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी मंत्री हेब्बाळकर यांच्याहस्ते मुलांसाठी शौर्य पुरस्कार, बालकल्याण क्षेत्रातील उत्कृष्ट सेवेसाठी संस्था आणि व्यक्तींना राज्य पुरस्कार देण्यात आले.
यावेळी महिला व बालकल्याण विभागाचे सचिव डॉ. जी. सी. प्रकाश, संचालक एम.एस. अर्चना, विभागाचे व्यवस्थापकीय संचालक पुष्पलता, अधिकारी व शेकडो चिमुकली मुले सहभागी झाली होती.

Tags: