Banglore

पोलीस इन्स्पेक्टरच्या खात्यातून तब्बल 8.25 लाख ट्रान्सफर

Share

सायबर गुन्हे सध्या सर्वत्र गाजत आहेत. सायबर गुन्ह्यांमुळे सर्वसामान्यांची फसवणूक होत असे. पण, आता सायबर गुन्हेगार त्यांचा माग काढू शकणाऱ्या पोलिसांनाच लक्ष्य करत असल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे.

होय! धारवाड उपनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक दयानंद शेगुणसी यांच्या बँक खात्यातून एकूण तब्बल 8.25 लाख रुपये ट्रान्सफर करण्यात आले आहेत. या संदर्भात हुबळी येथील सायबर क्राईम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

इन्स्पेक्टर दयानंद यांनी वैयक्तिकरित्या त्यांच्या बँक खात्याचे तपशील इतर कोणाशीही शेअर केले नसतानाही सायबर भामट्यानी त्यांच्या बँक खात्यातून पैसे हस्तांतरित केले आहेत.
बँकेच्या निष्काळजीपणामुळे नेट सिक्युरिटी न वापरता किंवा काही अधिकाऱ्याच्या हस्तक्षेपामुळे अज्ञात व्यक्तीने पैसे ट्रान्सफर केले. बँकेच्या खात्याशी जोडलेला शेगुणसी यांचा मोबाईल फोन बंद असताना भामट्यांनी इंटरनेट बँकिंगद्वारे 50,000 रुपये 12 वेळा, 45,000 रुपये तीन वेळा आणि 25,000 रुपये दोन वेळा ट्रान्सफर केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.

Tags: