दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री हनुमंतप्पा अल्नोड यांच्या नेतृत्वाखाली जेडीएसच्या दुष्काळ अभ्यास पथकाने धारवाड जिल्ह्यातील विविध गावांमध्ये जाऊन दुष्काळाचा अभ्यास केला आहे.
या पथकाने दुष्काळ अभ्यासासाठी गेलेल्या गावांतील वाळलेली पिके आणून जिल्हाधिकारी गुरुदत्त हेगडे यांना आणून दाखवली. मान्सूनच्या पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांनी पिकवलेली सर्व पिके पाण्याविना सुकून गेली आहेत. शेतकरी प्रचंड अडचणीत आहे. अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना पिकाची भरपाई मिळालेली नाही. पीक विमाही मिळत नाही. जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. पुरेशा वीज पुरवठ्याशिवाय पिकांना पाणी देता येत नाही, हे त्यांनी जिल्हाधिकार्यांना पटवून दिले.
राज्य काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांना 8 तास वीज देणार असल्याचे सांगितले, मात्र ते केवळ 5 तास वीज देत आहे. खोट्या हमी देऊन सत्तेवर आलेल्या काँग्रेसने शेतकऱ्यांची तातडीने दखल घ्यावी. राज्य सरकारने केंद्र सरकारला परिस्थिती पटवून देऊन यावर तोडगा काढावा. आम्ही धारवाड, गदग आणि हावेरी जिल्ह्यांतील दुष्काळाचा अभ्यास केला असून हा अहवाल आम्ही कुमारस्वामी यांना सादर करणार आहोत. यावर तात्काळ उपाय योजला नाही तर आम्ही सभागृहाच्या आत आणि बाहेर आंदोलन करू, असा इशारा जेडीएस नेत्यांनी दिला.


Recent Comments