सौंदत्ती तालुक्यातील शिरसंगी परिसरात आज भाजप नेत्यांकडून दुष्काळाचा पाहणीदौरा करण्यात आला.

अवर्षणाने राज्यात उदभवलेल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांची स्थिती शोचनीय झाली आहे. त्यामुळे भाजपकडून आपल्या आमदार व खासदारांकरवी राज्यात विविध ठिकाणी दुष्काळ आणि पीक नुकसानीची पाहणी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री अरविंद लिंबावळी, राज्यसभा सदस्य खा. इरण्णा कडाडी, आमदार अभय पाटील, विधान परिषद सदस्य हनुमंत निरानी यांनी सौंदत्तीजवळील शिरसंगी परिसरात आज दुष्काळाची आणि पीक नुकसानीची पाहणी केली.

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना माजी मंत्री अरविंद लिंबावळी म्हणाले की, कर्नाटकात यावेळेस दुष्काळ खूप गंभीर आहे. मात्र राज्यातील काँग्रेस सरकारने दुष्काळ गांभीर्याने घेतला नाही. त्यामुळे आमचे राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी, भाजप आमदार अभय पाटील, हनुमंत निरानी व आमचे सर्व नेते या दुष्काळ पाहणी दौऱ्यात सहभागी झाले आहेत. शिरसंगी गावातील शेतात पावसाविना पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
शेतकऱ्यांची परिस्थिती गंभीर आहे. केंद्र सरकार एनडीआरएफ फंडातून सातत्याने पैसे देत आहे.राज्य सरकारने दुष्काळ निवारणासाठी 300 कोटी अनुदान दिले आहे. 116 तालुके दुष्काळी जाहीर झाले असून प्रत्येक तालुक्याला प्रत्यक्षात 1 कोटीही मिळणार नाहीत. याकडे सरकारने लक्ष द्यावे, अशी सूचना त्यांनी केली.
राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी, भाजप आमदार अभय पाटील, हनुमंत निरानी आदी नेते यावेळी उपस्थित होते.


Recent Comments