खोटारडेपणा हा कुमारस्वामींच्या घरचा देव आहे, आकसातून ते आमच्यावर खोटे आरोप करत आहेत असे सांगत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी कुमारस्वामींवर ताशेरे ओढले.

मुलगा डॉ. यतींद्र मोबाईलवर बोलत असल्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात विरोधी पक्षनेत्यांनी सिद्दरामय्यांवर जोरदार टीका केली होती. त्यापाठोपाठ मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी त्यांच्या गृहजिल्हा म्हैसूरला आज भेट दिली.

यावेळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, राजकारणात आम्हाला द्वेष माहित नाही. जेव्हा कोणी काही चूक केली असेल तेव्हा आम्ही सहमत नाही. आम्ही द्वेषाचे राजकारण कधी केले नाही आणि करणारही नाही असे ते म्हणाले.
खोटारडेपणा हा कुमारस्वामींच्या घरचा देव आहे, पोटदुखीतून ते आमच्यावर खोटे आरोप करत आहेत. कुमारस्वामी जे काही बोलतात ते खोटे आहे. कुमारस्वामी यांनी आजपर्यंत काही सत्य सांगितले आहे का ते मला दाखवा. त्यानी फक्त एका जरी मुद्द्यावर खरे सांगितले आहे का ते मला सांगा. कुमारस्वामी म्हणजे, हे फक्त हिट अँड रन प्रकरण आहे.
कुमारस्वामी यांनी काल माझ्या मुलाबद्दल खोट्या बातम्या पसरवल्या. माझ्या मुलाने माझ्यासाठी मतदारसंघ सोडला. आता तो माझ्या वतीने मतदारसंघातील लोकांसाठी काम करतो आहे. लोकांची कामे करणे चुकीचे आहे का?, केडीपी सदस्य असल्याने त्याने माझ्याशी काही मुद्द्यांवर चर्चा केली. त्याचा वेगळा अर्थ आहे काढायचा का असा सवाल त्यांनी केला.


Recent Comments