एक शेतकरी कालव्यात पडून बेपत्ता झाल्याची घटना विजयपूर जिल्ह्यातील देवरहिप्परगी तालुक्यातील कारकोळ गावात घडली.
रेवणसिद्ध कैनूर (३०) असे शेतकऱ्याचे नाव असून तो कालव्यात पडला.

काल सायंकाळी तो शेताला पाणी देण्यासाठी मोटार आणण्यासाठी गेला असता तो घसरून कालव्यात पडला. गावकर्यांनी अग्निशमन दलाला माहिती देऊनही उपयोग झाला नाही. शेतकऱ्याचा शोध घेण्यासाठी कोणीही पुढे आले नाही.गावकऱ्यांनीच शेतकऱ्याचा शोध सुरू केला आहे. ही घटना देवहिप्परगी पोलीस ठाण्याच्या व्याप्तीत घडली आहे



Recent Comments