मुलगा यतींद्र माझ्याशी बदल्यांच्या मुद्द्यावर बोलला नाही, पण त्याने बदली घोटाळा केल्याचे सिद्ध झाले तर मी राजकारणातून निवृत्ती घेईन, असे आव्हान मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिले.
बंगळुरमध्ये आज प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की, यतिंद्र माझ्याशी बदल्यांच्या मुद्द्यावर काहीही बोललेला नाही. त्याऐवजी तो सीएसआर फंडाबद्दल बोलला. माझ्या राजकीय कारकिर्दीत मी कोणताही बदलीचा व्यवसाय केलेला नाही. आपण बदलीचा व्यवसाय केल्याचे कोणी सिद्ध केल्यास राजकारणातून संन्यास घेईन असे सांगितले.
यतींद्रनी उल्लेख केलेली पाच नावे कोणाची आहेत, या प्रश्नावर पाच नावे घेतली म्हणजे काय?, ती सीएसआर यादी आहे, सीएसआर निधीतून शाळांच्या इमारतींची दुरुस्ती करायची आहे. यतिंद्र यांनी याबाबत काय सांगितले होते, ते आधी पहा, असे त्यांनी स्पष्ट केले.
यतींद्र यांच्या फोनवरील संभाषणाच्या व्हिडिओबाबत माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना त्यांनी कुमारस्वामींवर राजकारणाचा आरोप केला. माजी मुख्यमंत्री असताना त्यांनी आपल्या घरासाठी बेकायदेशीरपणे वीज मिळवली आणि घर सजवले. हा गुन्हा नाही का, असा प्रश्न करून ते कृत्य झाकण्यासाठी एचडीके हे करत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ज्यांनी चूक केली असेल त्यांच्यावर एफआयआर दाखल करावी. त्यावर पांघरूण घालण्यासाठी ते असे बोलत आहेत, असे ते म्हणाले.


Recent Comments