Banglore

डीके शिवकुमार यांची सिद्धूपुत्र यतिंद्र यांच्यासाठी बॅटिंग

Share

सीएम सिद्धरामय्या यांचे पुत्र डॉ. यतिंद्र सिद्धरामय्या यांचा मोबाईलवर बोलण्याच्या लिस्टचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताच, उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी यतिंद्र यांच्यासाठी जोरदार बॅटिंग केली आहे.

कुमारस्वामींनी यतिंद्रबद्दल शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये कुठेही ‘बदली’ हा शब्द आलेला नाही, तो लाचखोरीबद्दल कुठे बोलला आहे, ते उगाचच प्रचार करत आहे आणि आमच्या मुलाला नेता बनवत आहेत, करू द्या त्यांना असे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी सांगितले.

मी तो व्हिडिओ पाहिला आहे ज्यामध्ये यतिंद्र यांनी बदलीबद्दल काय बोलले आहेत ते दाखवा पाहू. एका माजी आमदाराने चार-पाच अधिका-यांच्या बदल्या मागितल्या तर त्यात गैर काय? माझा भाऊ माझ्या मतदारसंघात काही कार्यक्रमांना हजर असतो. लोकांना घरे, गायी, मेंढ्या हव्या असतात. तशा कार्यक्रमांना सुरेश उपस्थित असतो. मी नंतर सही करतो. मी बगेर हुकुम समितीचा अध्यक्ष आहे. सर्व काही एकट्यानेच पाहणे शक्य होत नाही, असे ते म्हणाले.

यतिंद्र हे सिद्धरामय्यांची दिशाभूल करत असल्याच्या भाजप नेत्यांच्या आरोपाला प्रत्यूत्तर देताना, मुख्यमंत्र्यांना ४० वर्षांचा राजकीय अनुभव आहे. त्यांची कोणी दिशाभूल करू शकत नाही, असे डीके शिवकुमार यांनी सांगितले.
बिचाऱ्या भाजप आणि जेडीएसला आता काहीही काम उरलेले नाही. यतींद्र हे केडीपीचे सदस्य आहेत. ते आश्रय समितीचे अध्यक्ष आहेत. जनसंपर्क बैठक घेत आहेत. यतींद्र काही शाळांना पायाभूत सुविधा पुरविण्याबाबत बोलले आहेत असे डीकेशिनी सांगितले.

स्थानिकांनी महादेव नावाच्या अधिकाऱ्यावर आरोप केला आहे. आश्रय समितीचे अध्यक्ष आणि इतर आमदारांना समान अधिकार आहेत. कुमारस्वामींना हे कळत नाही का? कुमारस्वामी हताश आहेत. कुमारस्वामी यांना फसवणूक आणि घोटाळे करण्याचा अनुभव आहे म्हणून त्यांनी असे ट्विट केले आहे, करू द्या, असे ते म्हणाले.

Tags: