Banglore

विजयेंद्र यांनी घेतली बसवराज बोम्मई यांची भेट

Share

दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले; त्यांचे मार्गदर्शनही मी मागितले आहे. मी भेटल्याने त्यांना खूप आनंद झाला असे भाजपचे नूतन प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी सांगितले.

बी.वाय.विजयेंद्र यांनी आज सकाळी माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, बोम्मई यांनी या भेटीत आपल्याला सांगितले की, प्रदेशाध्यक्षपदी तुमच्या निवडीने राज्यात भाजपला मोठी शक्ती मिळाली आहे. फक्त मीच नाही; तर सर्व वडीलधारी मंडळी तुमच्यासोबत असणार आहेत; देशाचे भवितव्य घडवणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुकीला आपण सर्वांनी एकत्रितपणे सामोरे जायचे आहे, असे त्यांनी सांगितले.

राज्यभर फिरून तुमच्या नेतृत्वाखाली पक्ष मजबूत करण्याचे काम करू, असे बोम्मई यांनी म्हटल्याचे विजयेंद्र यांनी सांगितले.
मी बोम्मई यांना येत्या 15 तारखेला बुधवारी ही जबाबदारी स्वीकारताना येऊन आशीर्वाद देण्याची विनंती केली आहे, असे विजयेंद्र यांनी सांगितले.

Tags: