हॉटेल उद्योगात आणि कर्नाटकाच्या उभारणीत बंटर समाजाचे खूप मोठे योगदान आहे, देव या समाजाचे कल्याण करो, असे गौरवोद्गार महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी काढले.
उडुपी येथे मुख्यमंत्री सिद्दरामय्या यांच्या उपस्थितीत आज जागतिक बंटर परिषद पार पडली. या परिषदेला संबोधित करताना मंत्री हेब्बाळकर म्हणाल्या की बंटर समाजातील लोक कला, क्रीडा, साहित्य अशा प्रत्येक क्षेत्रात आढळतात. समाजातील अनेकांनी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतल्याची आठवण त्यांनी सांगितली.
मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या की, उडुपी-मंगळूर बंटर समाजाने इतर राज्यांत व परदेशातील बंटर समाजाला एकत्र करण्याचे काम या परिषदेच्या माध्यमातून केले आहे. माझ्या मूळ गावी बेळगावमध्ये माझे बंटर समाजाशी चांगले संबंध आहेत. हॉटेल उद्योगात बंटर समाजाचे योगदान अनन्यसाधारण आहे. बंटर समाजाचे यश पाहिल्यास याचा अर्थ या समाजावर देवाचा आशीर्वाद आहे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी उडुपी मठाचे श्री श्री श्री सुगुणेंद्र तीर्थ श्रीपाद, पालीमारू मठाचे विद्यादिशा तीर्थ श्रीपाद, विधानसभा अध्यक्ष यू टी खादर, ग्लोबल फेडरेशन ऑफ बंटर असोसिएशनचे अध्यक्ष आयकला हरीश शेट्टी, आमदार गणेश हुक्केरी, यशपाल सुवर्ण, अशोक कुमार राय, मंजुनाथ भंडारी, माजी मंत्री रमानाथ राय यांच्यासह बंतर समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments