भीषण दुष्काळाने होरपळलेल्या विजयपूर जिल्ह्यातील जनता मान्सूनच्या पावसावर अवलंबून होती. मात्र, मान्सूनचा पाऊस येत असल्याने विजयपूर तालुक्यातील हित्तीनहल्ली गावात गाढवाचे पाय धरून प्रार्थना केल्याची घटना घडली.

श्री बिरेश्वर मंदिराच्या वतीने गाढवांचे लग्न लावून गावातील वडीलधाऱ्यांनी वरूणरायाला प्रार्थना केली होती . आता पाऊस न पडल्याने त्यांनी गाढवाचा पाय धरून पावसाच्यासाठी नतमस्तक होऊन प्रार्थना केली. त्यांनी वरुणदेवाला सर्वांना सुखी ठेवण्याची विनवणी केली.वेळ आल्यावर गाढवाचे पाय धरावे लागते ही म्हण येथे खरी आहे


Recent Comments