Banglore

कित्तूर उत्सव ज्योती यात्रेचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याहस्ते शुभारंभ

Share

कित्तूर राणी चन्नम्मा स्वाभिमानाच्या संघर्षाचे प्रेरणास्थान आहेत असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले.

कन्नड आणि संस्कृती विभाग, बेळगाव जिल्हा प्रशासन चन्नम्मा, कित्तूर उत्सवाच्या ज्योती यात्रेच्या शुभारंभप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. ते पुढे म्हणाले, कित्तूर चन्नम्मा ही एक महान राणी होती, जिने आपल्या छोट्या सैन्यासह प्रचंड ब्रिटिश सैन्याला आव्हान दिले होते. मी पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यावर कित्तूर उत्सव आणि जयंती उत्सव सुरू केला. कारण मला तिचे धैर्य आणि आदर्श आजच्या तरुण पिढीपर्यंत पोहोचवायचे होते, असे ते म्हणाले.

याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी, कित्तूरचे आमदार बाबासाहेब पाटील, धारवाड ग्रामीणचे आमदार विनय कुलकर्णी, बैलहोंगलचे आमदार महांतेश कौजलगी, मुख्यमंत्र्यांचे राजकीय सचिव गोविंदराजू उपस्थित होते.

Tags: