मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नवीन 148 स्लीपर बसेस विधान सौधाजवळ लॉन्च केल्या.

विधानसौधच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ नवीन बसेसना मुख्यमंत्र्यांनी हिरवे निशाण दाखवले . त्यानंतर त्यांनी मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसोबत बसेसची पाहणी केली. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार, परिवहन मंत्री रामलिंगारेड्डी, मंत्री मुनियप्पा, दिनेश गुंडुराव, ईश्वर खंडरे आणि परिवहन अधिकारी उपस्थित होते. आज म्हैसूर जिल्ह्याचा दौरा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी नवीन बसेसचा शुभारंभ करून ,म्हैसूरला प्रयाण केले.
आज एकूण 148 नवीन बसेस सोडण्यात आल्या असून त्यापैकी 44 एसी स्लीपर आणि चार नॉन एसी स्लीपर बस आहेत. मात्र, स्लीपर बस वगळता इतर सर्व बसमध्ये महिलांना मोफत प्रवास करण्याची परवानगी आहे. 40 नॉन-एसी स्लीपर आणि 100 नागरी परिवहन बस अशोक लेलँड कंपनीच्या आहेत, तर चार नॉन-एसी स्लीपर आणि चार एसी स्लीपर बस टाटा कंपनीच्या आहेत.


Recent Comments