Banglore

आघाडीचा निर्णय वरिष्ठांच्या पातळीवर, सोमशेखर यांचे वक्तव्य पक्षविरोधी : अश्वत्थ नारायण

Share

जेडीएससोबत युतीचा निर्णय वरिष्ठ नेत्यांच्या पातळीवर झालेला आहे. त्यामुळे कोणीही वैयक्तिक वक्तव्य करू नये, असे सांगत माजी मंत्री अश्वत्थ नारायण यांनी भाजप-जेडीएस युतीला विरोध दर्शवणाऱ्या आमदार एस. टी. सोमशेखर यांच्या विरोधात नाराजी व्यक्त केली.

याबाबत आज प्रसारमाध्यमांशी बोलताना अश्वत्थ नारायण म्हणाले की, पक्षश्रेष्ठींनी युतीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एसटी सोमशेखर यांचे विधान पक्षविरोधी ठरते. मतभेद असतील तर संबंधित नेत्यांशी बोला. तसे (युती) व्हायला नको होते, असे म्हणायला आम्ही पक्षापेक्षा मोठे नाही. पक्षातील जबाबदार व्यक्ती जेव्हा निर्णय घेतात तेव्हा सहकार्य करणे हे आपले कर्तव्य असल्याचे ते म्हणाले.

सिद्धरामय्या आणि त्यांचे मंत्रिमंडळ आणि सरकारच्या गुणवत्तेवर चर्चा होत नाही. त्यांनी दर्जेदार शिक्षण दिले, प्रशासन दिले, भ्रष्टाचारमुक्त प्रशासन दिले असे म्हणायचे का? सकाळी उठल्यापासून फक्त आणि फक्त राजकारण करतात. त्यांचे आमदार जातीवादाच्या मुद्द्यावर चर्चा करत आहेत.

आर्थिक प्रगतीची चिन्हे नाहीत. त्यांच्या ज्येष्ठ आमदारांनी जातीयवाद सुरू केला आहे. ते समाजाला वेठीस धरण्यात, विशिष्ट लोकांचे तुष्टीकरण करण्यात गुंतले आहेत असा आरोप अश्वत्थ नारायण यांनी केला

Tags: