Dharwad

धारवाड तालुक्यातील कळकेरी गावातील शेतात आढळला महाकाय अजगर

Share

धारवाड तालुक्यातील कळकेरी येथे एका शेतकऱ्याच्या शेतात मोठा अजगर दिसल्याने खळबळ उडाली आहे. घटनास्थळी दाखल झालेल्या सर्पमित्र यल्लाप्पा यांनी अजगराला पकडून जंगलात सोडून दिले, आणि शेतकऱ्यांना भयमुक्त केले .

शेतात मोठा अजगर दिसून आल्याने शेतकरी शेतीची कामे करण्यास व पाळीव जनावरे शेतात आणण्यास घाबरत असल्याची परिस्थिती निर्माण झाली होती.

याबाबत स्थानिक शेतकऱ्यांनी सर्पमित्र यल्लाप्पाला माहिती देऊन त्यांच्याकरवी त्या अजगराला पकडले आणि सुरक्षित जंगलात सोडून दिले .

Tags: