Banglore

आम्ही तुमच्यासोबत, लोकांना त्रास देऊ नका : डीकेशींचे आंदोलकांना आवाहन

Share

आम्ही तुमच्यासोबतच आहोत, लोकांना त्रास देऊ नका असे आवाहन करत, राज्याच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आंदोलन करणाऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य करू असे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी म्हटले आहे.

कावेरी नदीचे पाणी तमिळनाडूला सोडण्यास कर्नाटकात तीव्र विरोध सुरू आहे. कन्नड समर्थक संघटनांसह विविध संघटनांनी 26 सप्टेंबर रोजी बेंगळुर बंदची हाक दिली आहे. या बंदला एक, दोन नव्हे, दीडशे संघटनांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे उद्या बेंगळुर पूर्णपणे शांत असेल. पण यावर मंत्री म्हणून मी बोलू शकत नाही, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी दिली. मला न्यायालयाचा आदर करावा लागेल आणि लोकांचे रक्षण करावे लागेल. माझी आणि आमच्या सरकारची स्थिती सैतान आणि अथांग समुद्रासारखी आहे. आपण आपल्या राज्याचे हित जपलेच पाहिजे, हे आपले कर्तव्य आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

अखंड कर्नाटक बंदबाबत बोलताना डीके शिवकुमार म्हणाले की, आम्ही तुमच्यासोबत आहोत. लोकांना त्रास होऊ नये. जनतेने सहकार्य दिले नाही तर त्या बंदला अर्थ रहात नाही. आंदोलकांत चर्चा सुरू आहे. आम्ही त्यात प्रवेश करणार नाही. त्यांनाही न्यायालयीन प्रकरणाची माहिती आहे, त्यांनी तेसुद्धा पहावे असे डीकेशी यांनी सांगितले.

Tags: