धारवाड जिल्ह्यामधील शेतकरी आपले पीक गमावून कर्जाच्या खाईत सापडले आहेत. त्यामुळे शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरु झाले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 11 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.
होय, धारवाड जिल्ह्यात आतापर्यंत 11 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मात्र एकाही शेतकरी कुटुंबाला दिलासा मिळाला नाही. कुटुंबाचा मालक गमावलेल्या त्यांच्या पत्नी आणि मुलेबाळे अश्रू ढाळत असल्याचे हृदय पिळवटून टाकणारे दृश्य पहायला मिळत आहे.
धारवाड तालुक्यातील कवलगेरी गावातील बसवराज तोटगेर यांनी गेल्या महिन्यात कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली होती, शासनाकडून कोणतीही मदत न मिळाल्याने बसवराज यांचे कुटुंबीय आक्रोश करत आहे.
त्यांनी कर्नाटक ग्रामीण विकास बँक आणि कॅनरा बँकेकडून 4 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते, तसेच बाहेरील खासगी संस्थांकडून कर्ज घेतले होते आणि दुष्काळामुळे पिकांचे नुकसान झाल्याने त्यांनी घरी कोणी नसताना आत्महत्या केली.
कर्जबाजारी होऊन आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण अर्धवट सोडावे लागत आहे. जुलै महिन्यात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला कोणतीही भरपाई न मिळाल्याने शेतकरी कुटुंब अडचणीत सापडले आहे. शासनाने जागे होऊन शेतकरी कुटुंबांना योग्य तो दिलासा देण्याची गरज आहे.


Recent Comments