फूट पाडा आणि राज्य करा हे संविधानविरोधकांचे धोरण आहे. अशा संविधानविरोधकांना सत्ता देऊन तुमचे, तुमच्या मुलांचे भविष्य खराब करू नका असे आवाहन मुख्यमंत्री सिद्दरामय्या यांनी केले.
कर्नाटक राज्य दलित संघर्ष समितीच्या वतीने बेंगळुरातील टाऊन हॉल येथे देवराज अरसू यांच्या जयंत्युत्सव व राज्यस्तरीय अधिवेशनाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना सिद्धरामय्या म्हणाले की, फूट पाडा आणि राज्य करा हे संविधानविरोधी धोरण नीट समजून घेतले पाहिजे. आंबेडकर संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष नसते तर आपल्या देशाला एवढी अर्थपूर्ण राज्यघटना मिळाली नसती. देवराज अरसु यांनी आंबेडकर आणि त्यांच्या संविधानाच्या इच्छेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी मोठे सामाजिक कार्य केले. मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याइतके सामाजिक न्यायाचे कार्यक्रम त्यांच्या आधी कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी राबवले नाहीत असे ते म्हणाले. बाईट.
Banglore
फूट पाडा आणि राज्य करा हे संविधानविरोधकांचे धोरण : सिद्दरामय्या


Recent Comments