Belagavi

केव्हीजी बँकेतून घेतलेली कृषिकर्जे माफ करण्याची मागणी

Share

शेतजमीन सिंचनासाठी अखंड सात तास वीज पुरवठा करावा, पावसाअभावी पिकांचे नुकसान झाल्याने कृषी कर्जे माफ करावीत आदी मागण्या सरकारने मान्य कराव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नेगीलयोगी रयत संघटनेने दिला आहे.

नेगीलयोगी रयत संघटनेच्या वतीने बेळगावात आज जिल्हाधिकारी कार्यालयात निदर्शने करून सरकारच्या नावाचे मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांना देण्यात आले.
यावेळी प्रसारमाध्यमांसोबत बोलताना नेगीलयोगी रयत संघटनेचे राज्याध्यक्ष रवी पाटील यांनी सांगितले की, चार तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन निवेदन दिले आहे. सरकार शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करत नाही, विशेषत:

शेतकऱ्यांना पुरेसा वीजपुरवठा होत नाही, पुरेसा पाऊसही न पडल्याने शेतकरी संकटात सापडला आहे, पिकांचे नुकसान झाले आहे, त्यामुळे शेतकरी केव्हीजी बँकेतून घेतलेले शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले पाहिजे, काँग्रेस सरकार हे चोराचे सरकार आहे, शेतकऱ्यांकडे लक्ष देत नाही, शेतकऱ्यांच्या समस्या सोडवाव्यात अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बमुदत आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला.

यावेळी जिल्हाधिकारी नितेश पाटील याना निदर्शक शेतकऱ्यांनी मागण्यांचे निवेदन सादर केले.
यावेळी नेगीलयोगी रयत संघटनेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: