कागवाड तालुक्यातील शेडबाळ शहरात जगद्गुरू बसवण्णांच्या काळात , सुमारे हजार वर्षांपूर्वी बांधलेल्या बसवण्णांच्या मंदिराचा कळसारोहण सोहळा पार पडला

श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी शेडबाळ येथील बसवण्णा देवाच्या भक्तांनी आयोजित केलेला कळसारोहण सोहळा , परमपूज्य डॉ.शिवयोगी शिवाचार्य महास्वामीजी हिरेमठ म्हैसाळ यांच्या दिव्य उपस्थितीत पार पडला.
रविवारी या कळसाची गावातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढून नंतर , हा कळस मंदिरात ठेवण्यात आला .
सोमवारी सकाळपासून वेदमूर्ती आनंद स्वामी, विशाल स्वामी यांनी विविध पूजाविधी, होम हवन , केले.
शिवयोगी शिवाचार्य स्वामीजींच्या अमृतहस्ते कळसारोहण संपन्न झाले . यावेळी बोलताना ,
डॉ. शिवयोगी शिवाचार्य स्वामीजींच्या आशीर्वादाने जगज्योती बसवण्णांच्या काळात सुमारे हजार वर्षांपूर्वी बांधलेल्या बसवण्णा मंदिराला मोठा इतिहास आहे, या मंदिरावरील कलश एका वेडसर तरुणाने चोरून नेला होता.
या मंदिराला प्राचीन काळाचा मोठा इतिहास आहे, या मंदिराची नोंद केंद्र सरकारच्या पुरातत्व विभागात झाली आहे, त्याची देखभाल करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, ते म्हणाले की, प्रत्येकाने आपल्या तत्त्वांचे पालन केले पाहिजे आणि ते कर्तव्य आहे. आजच्या तरुणांना हजार वर्षांच्या इतिहासाची माहिती देण्यासाठी वडीलधाऱ्यांची भूमिका मोठी आहे .
माजी मंत्री श्रीमंत पाटील यांच्या हस्ते महाप्रसाद पात्रांचे पूजन करण्यात आले. यावेळी बोलताना ते म्हणाले कि , बसवण्णा मंदिराला खूप मोठा इतिहास आहे, हे एक प्राचीन मंदिर आणि चैतन्यपूर्ण मंदिर आहे, श्रावण सोमवारच्या पवित्र कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व भाविकांना ईश्वर आशीर्वाद देवो.
डॉ.शिवयोगी शिवाचार्य स्वामीजींनी थेट भक्तांना देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या उकळत्या खिरीच्या भांड्यात हात घातला आणि हे पाहून सर्व भक्त आश्चर्यचकित झाले आणि स्वामीजींच्या भक्ती शक्तीला , भगवंताने दिलेल्या क्षमतेबद्दल चर्चा केली.
अथणी साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक श्रीनिवास पाटील, पट्टण पंचायतीचे मुख्याधिकारी .पुजारी, बसवण्णा देव मंदिराचे प्रमुख व गौडा अशोक पाटील, अतिक्रांत पाटील सुनील पाटील, वर्धमान पाटील, अश्वथ पाटील, , अशोक विभूते, महादेव चिंचळी, अरुण शिरसवाडे, रोहिदास मुंडे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमास राजू रत्नपगोळ, तमन्ना रत्नपगोळ, , मोहन लालगे, चिदानंद चौके यांच्यासह अनेक हितचिंतकांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
मंदिराचे पुजारी कुमार गुरुव यांनी सर्व मान्यवरांना प्रसाद देऊन आशीर्वाद दिला.


Recent Comments