हुबळी येथील इदगा मैदानावर महानगरपालिका आयुक्त ईश्वर उळागड्डी यांच्या हस्ते ध्वजारोहण करून ७७ वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला.
महात्मा गांधी आणि डॉ. बी.आर.आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व ध्वजारोहण करून ७७ वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. यावेळी महानगरपालिका सदस्य, अधिकारी व नागरिक उपस्थित हो.
हुबळी तालुका प्रशासन भवन येथे हुबळीचे ग्रामीण तहसीलदार प्रकाश नाशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करून ७७ वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला.
यावेळी हुबळी शहराचे तहसीलदार कलगौडा पाटील, तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी डॉ.रामचंद्र होसमनी, हुबळी ग्रामीण स्टेशनचे निरीक्षक मुरुगेश चन्ननवर, ग्रेड 2 चे तहसीलदार जी.व्ही.पाटील, तालुका स्तरावरील विविध
विभागांचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.


Recent Comments