भाजी विकण्यासाठी आलेल्या सोलापूर येथील तरुण शेतकऱ्याचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला.


मारुती जोत्याप्पा गोलभावी (३०) असे मृताचे नाव असून निप्पाणी शहरातील बेळगाव नाका परिसरातील मिरची बाजाराजवळ ही घटना घडली. या घटनेबाबत निपाणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निपाणीत पावसापासून बचाव करण्यासाठी मारुती गोलभावी हे टीसीच्या खांबाला ताडपत्री बांधत असताना त्यांना विजेचा धक्का बसून ते खाली पडले. त्यांना तात्काळ निपाणीच्या शासकीय महात्मा गांधी रुग्णालयात दाखल केले असता उपचाराविना त्यांचा मृत्यू झाला.
सीपीआय संगमेश शिवयोगी यांनी शहर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक उमादेवी आणि हेस्कॉम अभियंता अक्षय चौगुला यांच्यासह घटनास्थळी भेट दिली.



Recent Comments