नागरिकांच्या तक्रारींनंतर बेळगाव महानगर पालिकेला अखेर जाग आली आहे. मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने आज शहरातील काही बेकायदा खोकी आणि अतिक्रमणे हटवण्याची धडक कारवाई केली.
बेळगावात आज महानगरपालिका, एपीएमसी पोलीस आणि वाहतूक पोलिसांनी आज,गुरुवारी संयुक्त कारवाई करत अतिक्रमणांवर हातोडा हाणला. हिंडलगा गणपती मंदिरामागील विनायकनगर येथे अनधिकृतपणे थाटलेली खोकी, अतिक्रमणे हटवून पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने अखेर नागरिकांच्या तक्रारींची दखल घेतली. येथील अनधिकृत खोक्यांमुळे वाहतुकीला
अडचण येत होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूला रस्त्याचा बराचसा भाग अतिक्रमण करून ही खोकी थाटण्यात आली होती. त्याबाबत नागरिकांनी अनेकदा तक्रारी करूनही त्यांची दखल घेण्यात आली नव्हती. अखेर मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्या आदेशावरून मनपाच्या महसूल विभागाच्या निर्देशावरून मनपा अतिक्रमण निर्मूलन पथकाने ही अनधिकृत खोकी हटवली.

दरम्यान, बेळगाव शहराच्या अन्य भागातही अनधिकृत खोक्यांमुळे वाहतुकीला अडचण येत असून ती खोकी देखील हटवावीत अशी मागणी नागरिकांनी केली आहे.


Recent Comments