Belagavi

बेळगाव शहरामध्ये २२ डिसेंबर रोजी , राज्यस्तरीय भगवतगीता अभियान

Share

बेळगाव शहरामध्ये , २२ डिसेंबर रोजी , राज्यस्तरीय भगवतगीता अभियान , सुमारे एक लाख लोकांच्या उपस्थितीत आयोजित केले जाणार आहे , सर्वानी उपस्थित राहून हे अभियान यशस्वी करावे असे आवाहन करण्यात आले आहे .

व्हॉईस ओव्हर : आज बेळगाव शहरामध्ये विविध महाविद्यालये , संस्था आदींच्या प्रमुखांची बैठक घेण्यात आली .

२२ डिसेंबर या दिवशी गीता जयंती आहे . आणि आम्ही आमच्या मठातर्फे राज्यस्तरीय भगवतगीता अभियान प्रारंभ करीत आहोत . हे अभियान अनेक जिल्ह्यात पार पडले असून , या वर्षी बेळगाव जिल्ह्यात हे अभियान राबवण्याचा निर्णय घेतला आहे . आणि यासाठी एक समिती नेमायची आहे . २१ नोव्हेंबर पासून , हे गीता अभियान सुरु होणार आहे .

२२ डिसेंबर रोजी गीता जयंती नंतर २३ किंवा २४ डिसेम्बरला सार्वजनिक कार्यक्रम होणार आहे .

बहुतेक जिल्ह्यातून लाखाहुन जास्त लोक येणार आहेत . हा कार्यक्रम यशस्वी करण्याची जबाबदारी बेळगाव जिल्ह्यावर राहणार असून हा कार्यक्रम यशस्वी करण्याचे आवाहन केले .
यावेळी डॉ . . प्रभाकर कोरे , गोपाळ जिनगौडा , एस आर हेगडे, श्रीनिवास शिवनगी , काशिनाथ बिरादार , चेतन वेर्णेकर , सुभाष गळशेट्टी , कृष्ण भट आदी उपस्थित होते .

Tags: