बुडा आयुक्त प्रीतम नसलापुरे आणि स्मार्टसिटीच्या तीन एमडींवर दाखल झालेला गुन्हा हे सत्तेतील आमदारांचे म्हणणे ऐकून घेणार्या अधिकार्यांचे उदाहरण आहे असे आम आदमीचे नेते राजकुमार टोपन्नावर यांनी सांगितले.
शहरातील कन्नड साहित्य भवनात मंगळवारी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना राजकुमार टोपन्नावर म्हणाले की, बेळगाव नगर विकास प्राधिकरणातील (बुडा) बेकायदेशीरपणे जागेचे वाटप केल्याप्रकरणी दोषींवर कारवाई करण्यासाठी शहर पोलीस विभाग व लोकायुक्तांकडे तक्रारी करूनही कारवाई झाली नाही. त्यामुळे आम्ही न्यायालयात अर्ज केला. न्यायालयाने बुडा आयुक्त प्रीतम नसलापुरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश
दिल्यानंतर मंगळवारी बेळगाव लोकायुक्तांकडून गुन्हा दाखल करण्यात आला.
बेळगाव स्मार्ट सिटी एव्हिएशन गॅलरी, अँप थिएटर, व्हिलेज ऑफ इंडिया येथे बेळगावच्या स्थानिक आमदाराचे म्हणणे ऐकून ते बेळगाव व्हॅक्सिन डेपोमध्ये आरोग्य विभागाची परवानगी न घेता काम करत होते. शहराच्या पर्यावरणाला ते घातक होते. स्मार्ट सिटीच्या कामाला आमचा विरोध नाही. मात्र व्हॅक्सिन डेपोत सुरू असलेले काम योग्य नाही. त्यामुळे आरोग्य विभागाच्या डीएचओने आज स्मार्ट सिटीच्या तीन एमडींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा आमच्या संघर्षाचा विजय आहे,
असे ते म्हणाले.
सरकार येते आणि जाते. मात्र अधिकाऱ्यांनी जनतेसाठी काम करावे. परंतु सत्तेत असलेल्या आमदारांच्या दबावाखाली, त्यांचे शब्द ऐकून सत्तेचा गैरवापर करून कामे केली तर असे परिणाम भोगावे लागतील, असे ते म्हणाले.
पत्रकार परिषदेला रवींद्र बेल्लद उपस्थित होते.


Recent Comments