काँग्रेसने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात नमूद केलेल्या 5 हमी योजनांपैकी एक महिलांसाठी मोफत बस प्रवासाची मुभा देणाऱ्या शक्ती योजनेचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज विधानसौधच्या प्रांगणात उद्घाटन केले.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार आणि परिवहन मंत्री रामलिंग रेड्डी यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उदघाटन केले. सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांनी पाच महिलांना प्रतीकात्मक स्मार्ट कार्डचे वाटप केले. त्याचप्रमाणे शक्ती योजनेचा लोगो आणि स्मार्ट कार्डचे अनावरण केले.
कार्यक्रमाला संबोधित करताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी, महिला सक्षमीकरणासाठी शक्ती योजना लागू केली आहे. महिलांनी सार्वजनिक क्षेत्रात अधिक सहभाग घेतला पाहिजे. शतकानुशतके महिला संधीपासून वंचित आहेत. त्यांचे सामाजिक-आर्थिक सबलीकरण झाले पाहिजे. देशाच्या प्रगतीसाठी महिलांचा वाटा महत्त्वाचा आहे. 5 हमी पैकी 4 हमींचा महिलांना फायदा होणार आहे. आमच्या गॅरंटीवर टीका करणाऱ्या भाजप आणि जेडीएसची आम्हाला पर्वा नाही असे ते म्हणाले.
आम्ही 1 जुलैपासून गृहज्योती योजना राबवत आहोत. अन्नभाग्य योजनेंतर्गत प्रत्येकाला 10 किलो तांदूळ देणार आहोत. बीपीएल, अंत्योदय कार्डधारकांना 10 किलो तांदूळ दिला जाईल. अन्नभाग्य योजनेवर 10 हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून राज्यात कोणीही उपाशी झोपू नये, भूकमुक्त कर्नाटक निर्माण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले. बाईट.
उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार म्हणाले की, निवडणुकीदरम्यान आम्ही राज्यातील जनतेला 5 हमी दिल्या. त्यापैकी शक्ती योजना आज आम्ही सुरू केली. भाजप आणि जेडीएसच्या मित्रांनी टीकेचा वर्षाव केला आहे. टीका विरून जाते, फक्त केलेले काम उरते. विरोधकांना उत्तर देण्याची क्षमता आमच्याकडे जरूर नाही. पण आम्ही ते देणार नाही. बरीच चर्चा करून आम्ही मोफत वीज योजना लागू केली. आमचे राज्य दिवाळखोर होईल असे भाजप म्हणत आहे, पण आम्ही राज्याला संपन्न करू असे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार म्हणाले.

परिवहन मंत्री रामलिंगा रेड्डी यांनी प्रास्ताविकात सांगितले की, राज्यातील सर्व महिलांना आजपासून मोफत प्रवास करता येणार आहे. मोफत प्रवासासाठी बीपीएल, एपीएल असा नियम नाही. कोणतेही ओळखपत्र दाखवल्यास प्रवास करता येईल. स्मार्ट कार्ड बनवण्यासाठी कोणालाही पैसे द्यावे लागणार नाहीत. स्मार्ट कार्ड मिळवण्यासाठी 3 महिन्यांचा कालावधी आहे. दुपारी 1 नंतर मोफत प्रवास करण्याची परवानगी आहे. 90% पेक्षा जास्त बसमधून महिला राज्याच्या कोणत्याही कोपऱ्यात जाऊ शकतात, असे परिवहन मंत्री रामलिंगारेड्डी यांनी सांगितले.
कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार, परिवहन मंत्री रामलिंगा रेड्डी आणि अधिकाऱ्यांनी बीएमटीसीच्या बसमधून केम्पेगौडा स्थानकापर्यंत प्रवास केला.


Recent Comments