Chikkodi

बोरगावच्या युवकाची विष प्राशन करून आत्महत्या

Share

बेळगाव जिल्ह्यातील निपाणी तालुक्यातील बोरगाव शहरात एका युवकाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

34 वर्षीय शिवाजी बबन निकम असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. शिवाजीने बोरगाव येथील राहत्या घरी विष प्राशन करून जीवन संपाविले. त्याने विष प्राशन केल्याचे कुटुंबियांना

समजताच तातडीने शिवाजीला इचलकरंजी येथील इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मात्र उपचारांचा उपयोग न होता त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मागे वडील, आई आणि भाऊ असा परिवार आहे. सदलगा पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.

Tags: