Belagavi

बीएससी ग्राहकांसाठी मोफत ऑटोरिक्षा सेवा सुरु

Share

नाविन्यपूर्ण वस्त्रप्रावरणांचे कर्नाटकातील सर्वात मोठे रिटेल विक्रेते बी. एस. चन्नबसप्पा अँड सन्सने आज 01 जून 2023 रोजी आपल्या ग्राहकांसाठी बेळगाव शहरात मोफत ऑटो सेवा सुरू केली. ही सुविधा सीबीटी बस स्टँड ते गोवावेस बीएस्सी मॉलपर्यंत व तेथून परत सीबीटीपर्यंत प्रवास करणार्‍या सर्व बीएस्सी ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिली आहे.

यावेळी संबोधित करताना बीएससी द टेक्सटाईल मॉलचे एमडी मृणाल बीएस म्हणाले, “ग्राहकांचे समाधान हे नेहमीच आमचे सर्वोच्च प्राधान्य राहिले आहे. त्यामुळे बसस्थानकापासून आमच्या मॉलपर्यंत विविध शहरे आणि खेड्यांमधून येणाऱ्या ग्राहकांना मदत करण्यासाठी आम्ही मोफत ऑटो सेवा सुविधेची व्यवस्था करत आहोत.

पावसाळ्यात मॉलमध्ये पोहोचण्यासाठी ही सेवा विशेषतः उपयुक्त आहे. मी सर्व ग्राहकांना विनंती करतो की त्यांनी या मोफत सुविधेचा वापर करावा.”
यावेळी बीएससी टेक्सटाईल मॉलचे विपणन व्यवस्थापक इरणा शिवशेट्टी व अन्य उपस्थित होते.

Tags: