Belagavi

15 दिवसांपासून स्मार्टसिटी रस्त्यावर वाहतेय ड्रेनेजचे सांडपाणी

Share

बेळगाव शहरातील गॅंगवाडी येथील धर्मनाथ भवन जवळ , ड्रेनेजचे पाणी मागील १५ दिवसांपासून रस्त्यावर वहात आहे. मात्र अनेकदा तक्रार करून देखील महानगर पालिकेकडून याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे . यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे .

बेळगाव मध्ये सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत . सर्व नगरसेवक आपापल्या भागातील विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारांच्या प्रचारात गुंतले आहेत तर अधिकारी वर्ग निवडणूक कामात व्यस्त आहे . त्यामुळे शहरातील स्वच्छता आणि अन्य व्यवस्थेकडे दुर्लक्ष होत आहे . आता हेच पहा ना ! गेल्या १५ दिवसांपासून गॅंग वाडी ,धर्मनाथ भवन जवळ मागील १५ दिवसांपासून ड्रेनेजचे सांडपाणी ओव्हरफ्लो होऊन रस्त्यावर वाहत आहे . यामुळे परिसरात दुर्गंधी आणि अस्वच्छता पसरली आहे .

वारंवार महापालिकेकडे तक्रार करून देखील ही ड्रेनेज समस्या दूर न झाल्याने वैतागलेल्या एका नागरिकाने आपली मराठीही बोलताना आपली नाराजी व्यक्त केली . गेल्या पंधरा दिवसांपासून , ड्रेनेजचे सांडपाणी रस्त्यावर वाहत असून ,परिसरात दुर्गंधी सुटली आहे . डासांची पैदास वाढली आहे . मात्र तक्रार करून देखील महापालिकेकडून कोणताच प्रतिसाद मिळालेला नाही . लवकरात लवकर ही समस्या दूर करावी अशी मागणी त्यांनी केली .

जरी निवडणूक कार्य असले तरी , नागरी समस्यांकडे महापालिकेने लक्ष देणें आवश्यक आहे . ह्या भागात रस्त्यावरून वाहणारे सांडपाणी जनतेच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. याची दखल घेऊन , संबंधित लोकप्रतिनिधी आणि , पालिका अधिकाऱ्यांनी तातडीने याकडे लक्ष देऊन ही समस्या सोडवावी अशी मागणी या भागातील रहिवासी करीत आहेत .

Tags: